जिल्हा पोलिसांत मोठा फेरबदल, १२ निरीक्षकांसह २७ जणांच्या बदल्या; अनेक ठाण्यांचे कारभारी बदलले

<p>जिल्हा पोलिसांत मोठा फेरबदल, १२ निरीक्षकांसह २७ जणांच्या बदल्या<strong>; अनेक ठाण्यांचे कारभारी बदलले</strong></p>

कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठा फेरबदल करण्यात आला असून २७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि एका पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी रात्री याबाबतचे आदेश जारी केले.

या बदल्यांनुसार नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांची सायबर पोलिस ठाण्यात, राजेंद्र सावंत्रे यांची शाहूवाडी येथे, अजित सिद यांची पोलिस कल्याण विभागात, तर नामदेव शिंदे यांची विमानतळ सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. सतीश होडगर यांची राजारामपुरीत, तर रवींद्र कळमकर यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

तसेच, सत्यवान हाके यांची जयसिंगपूर येथून हुपरी येथे, सचिन सूर्यवंशी यांची शहापूर येथून राधानगरी येथे, गजेंद्र लोहार यांची जिल्हा विशेष शाखेतून शहापूर येथे, निगाप्पा चौखंडे यांची हुपरी येथून चंदगड येथे, संतोष गोरे यांची राधानगरी येथून जयसिंगपूर येथे, तर विश्वास पाटील यांची चंदगड येथून जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे.

सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये नागेश यमगर यांची आजरा येथून शिवाजीनगर येथे, शीतलकुमार कोल्हाळ यांची अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षातून शिवाजीनगर येथे, कैलास कोडग यांची कोडोली येथून इस्पुर्ली येथे, क्रांती पाटील यांची इस्पुर्ली येथून मुरगूड येथे, शिवाजी करे यांची मुरगूड येथून करवीर येथे बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, रविराज फडणीस यांची वाचक शाखेतून कोडोली येथे, तब्बसुम मगदूम यांची गोकुळ शिरगाव येथून शाहूपुरी येथे, अतुल कदम यांची नियंत्रण कक्षातून नेसरी येथे, बाबासाहेब सरवदे यांची करवीर येथून आजरा येथे, भारत साळुंखे यांची राजारामपुरी येथून गगनबावडा येथे बदली झाली आहे.

तसेच चेतन मसुटगे यांची नेसरी येथून गोकुळ शिरगाव येथे, धोंडीराम वाळवेकर यांची नियंत्रण कक्षातून वाचक शाखेत, रितल पुरळे यांची शिवाजीनगर येथून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षात, तर मुद्दस्सर शेख यांची शाहूपुरी येथून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक मृणालिनी कलगोंडा पाटील यांची नियंत्रण कक्षातून इचलकरंजी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

कोडोली येथील सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग हे सध्या जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या बंदोबस्तात कार्यरत असून बंदोबस्त संपल्यानंतर ते इस्पुर्ली येथे कार्यभार स्वीकारणार आहेत. तोपर्यंत इस्पुर्लीचा अतिरिक्त कार्यभार क्रांती पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि एका पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी (दि. २५) रात्री या बदल्यांचे आदेश जारी केले.

नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांची सायबर पोलिस ठाण्यात, राजेंद्र सावंत्रे यांची शाहूवाडी येथे, अजित सिद यांची पोलिस कल्याण विभागात, तर नामदेव शिंदे यांची विमानतळ सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. सतीश होडगर यांची राजारामपुरीत, तर रवींद्र कळमकर यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

सत्यवान हाके यांची जयसिंगपूर येथून हुपरी येथे, सचिन सूर्यवंशी यांची शहापूर येथून राधानगरी येथे, गजेंद्र लोहार यांची जिल्हा विशेष शाखेतून शहापूर येथे, निगाप्पा चौखंडे यांची हुपरी येथून चंदगड येथे, संतोष गोरे यांची राधानगरी येथून जयसिंगपूर येथे, तर विश्वास पाटील यांची चंदगड येथून जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे.

सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये नागेश यमगर यांची आजरा येथून शिवाजीनगर येथे, शीतलकुमार कोल्हाळ यांची अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षातून शिवाजीनगर येथे, कैलास कोडग यांची कोडोली येथून इस्पुर्ली येथे, क्रांती पाटील यांची इस्पुर्ली येथून मुरगूड येथे, शिवाजी करे यांची मुरगूड येथून करवीर येथे बदली झाली आहे.

तसेच, रविराज फडणीस यांची वाचक शाखेतून कोडोली येथे, तब्बसुम मगदूम यांची गोकुळ शिरगाव येथून शाहूपुरी येथे, अतुल कदम यांची नियंत्रण कक्षातून नेसरी येथे, बाबासाहेब सरवदे यांची करवीर येथून आजरा येथे, भारत साळुंखे यांची राजारामपुरी येथून गगनबावडा येथे बदली करण्यात आली आहे.

चेतन मसुटगे यांची नेसरी येथून गोकुळ शिरगाव येथे, धोंडीराम वाळवेकर यांची नियंत्रण कक्षातून वाचक शाखेत, रितल पुरळे यांची शिवाजीनगर येथून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षात, तर मुद्दस्सर शेख यांची शाहूपुरी येथून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

पोलिस उपनिरीक्षक मृणालिनी कलगोंडा पाटील यांची नियंत्रण कक्षातून इचलकरंजी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, कोडोली येथील सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग हे सध्या जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या बंदोबस्तात कार्यरत आहेत. बंदोबस्त संपल्यानंतर ते इस्पुर्ली येथे कार्यभार स्वीकारणार आहेत. तोपर्यंत इस्पुर्लीचा अतिरिक्त कार्यभार क्रांती पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.