डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे छत्रपती घराण्याला मोठा धक्का : संभाजीराजे छत्रपती 

<p>डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे छत्रपती घराण्याला मोठा धक्का : संभाजीराजे छत्रपती </p>

कोल्हापूर -  ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी, डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे छत्रपती घराण्याला मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे.
 डॉ. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास देशासह जगात पोहचवला, असे मोठे  व्यक्तिमत्व हरपल्याचं मोठं दु: ख आहे. त्यांना शब्दात मांडणं सोपं नाहीय. त्यांनी लिहिलेला इतिहास जिवंत  ठेवायचा असेल तर त्यांचे विचार सर्वांनी पुढे घेवून जायला हवं. ते सांगतील तीच इतिहासाची पूर्व दिशा असायची. त्यांचे विचार जपणे हीच खरी  आदरांजली असल्याचे संभाजीराजे यांनी  म्हटले आहे.