‘खरात हा सरकार पुरस्कृत बाबा’ ,सरकारी तिजोरीतून खरातच्या मंदिरासाठी कोटींचा निधी
: विजय कुंभारांचा धक्कादायक दावा
: विजय कुंभारांचा धक्कादायक दावा
पुणे – नाशिकच्या मिरगावमधील अशोक खरातच्या श्री सिद्धेश्वर इशानेश्वर देवस्थानला 105 कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागाने 31 मार्च 2018 मध्ये मंजूर केला आणि त्या वर्षी 25 लाखांचा निधी देण्यात आल्याचा खळबळजनक दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केला आहे. सरकारी तिजोरीतून खरातला कोटींचा निधी गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विजय कुंभार यांनी, पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात हा सरकार पुरस्कृत बाबा आहे. असा दावा केला आहे. ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचं शोषण झालं, त्यासाठी सरकारने निधी पुरवला आहे, असा आरोप करत सरकार खरातवर कशी खैरात करत होतं, हे कुंभारांनी पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.