रुपाली चाकणकर विरोधातील रोष वाढला...राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी नाराजी
नाशिक - विकृत अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचे नाव आल्याने त्यांच्या विरोधातील रोष वाढत चालला आहे. हा रोष इतका वाढला आहे कि, नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांना पक्षातील सर्व पदावरून हटवा, अशी मागणी केली आहे.
अशोक खरात याच्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा समावेश असल्याने पक्षासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि रोष आहे. राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाही, त्यामुळे नाशिकच्या अनेक महिलांनी राजीनामा देखील दिल्याची माहिती आहे. पक्षात महिलांची गरज आहे आणि त्या सुरक्षित असल्या पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.