‘माझ्या बोटाला…’: बोटाच्या दुखापतीवर अखेर खा. सुनील तटकरे बोलले 

<p>‘माझ्या बोटाला…’: बोटाच्या दुखापतीवर अखेर खा. सुनील तटकरे बोलले </p>

नवी दिल्ली – नाशिकच्या अशोक खरातच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि खा. सुनील तटकरे यांच्या  बोटाला दुखापती झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या भोंदू बाबाच्या संपर्कात हे नेते मंडळी असल्याच्या उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
यावर पहिल्यांदा  खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांसमोर येत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी बोटाच्या दुखापतीवर बोलताना म्हटले आहे कि, मला अलिबाग दौऱ्यादरम्यान 2014 मध्ये गाडीचा दरवाजा लावताना बोटाला दुखापत झाली होती. ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. खरात प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. मी श्रद्धा मानतो पण अंधश्रद्धा नाही. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भोंदू खरात प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.