शाहू मिल परिसराची संयुक्त पाहणी; २८ मार्चला न्यू पॅलेस येथे लोकप्रतिनिधींची बैठक

<p>शाहू मिल परिसराची संयुक्त पाहणी; २८ मार्चला न्यू पॅलेस येथे लोकप्रतिनिधींची बैठक</p>

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शाहू मिल परिसराची आज सकाळी संयुक्त पाहणी करण्यात आली. रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या समवेत शाहूप्रेमींनी या ठिकाणाची पाहणी केली.

पाहणीनंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक दि. २८ मार्च २०२६ रोजी न्यू पॅलेस येथे होणार असून, मंत्री, आमदार, खासदार, महापौर व उपमहापौर यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

या बैठकीत शाहू मिल परिसरासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहार करण्यात आला असून समितीतील काही सदस्य प्रत्यक्ष भेटी घेऊनही आमंत्रण देणार आहेत.

आजच्या पाहणीवेळी अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, विजय देवणे, शिवाजीराव कवाळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.