भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री...

<p>भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री...</p>

नाशिक – महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकच्या विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे. 

भोंदूबाबा खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधाचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटीकडून गोळा करण्याचे काम सुरू आहेत. शनिवारी एसआयटीकडून खरातची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली आहे. 
यात खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची  तपासणी होणार  आहे. ज्यामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरण पत्रांची पडताळणी होणार असून देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे  रडारवर असणार आहे  तर दुसरीकडे जमिनीच्या व्यवहाराच्या संबंधीत असणारे ही पोलिसांच्या रडारवर आहेत.