अशोक खरात प्रकरण : आपल्याकडे या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे : मुख्यमंत्री  

<p>अशोक खरात प्रकरण : आपल्याकडे या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे : मुख्यमंत्री  </p>

मुंबई – अशोक खरातकडे अनेक लोकं जायचे, विरोधी पक्षाचे कोणकोण गेलेत त्याचे पुरावे देऊ शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हटले आहे. तसेच आपल्याकडे या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे आहेत. पण, हे पोलिसांच्या हाती असून मुळात हे पोलिसांचे काम असल्याचं सांगत या प्रकरणी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर त्याचा भांडाफोड केला आहे,  याची आम्हाला कल्पना होती, की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत. ज्यामुळं जे पीडित आहेत त्यांना धीर देऊन, त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात काही महिला प्रतिसादही देत आहेत', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.