कोल्हापुरात दरोडा : सांगरुळ येथील ज्वेलर्स मालकावर हल्ला करून दागिने लुटले

<p>कोल्हापुरात दरोडा : सांगरुळ येथील ज्वेलर्स मालकावर हल्ला करून दागिने लुटले</p>

कोल्हापूर - सांगरुळ येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स चे मालक तेजस माळी (सुंदेशा) हे रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी गंगावेश येथे जात असताना विलास कॉर्नर या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून हात-पाय बांधले आणि त्यांच्या जवळील अंदाजे ४ ते ५ तोळे दागिने लुटून फरार झाले. नातेवाईकांच्या माहितीनुसार, ही घटना दोनचाकी वाहनांवरून आलेल्या सुमारे पाच अज्ञात व्यक्तींनी घडवली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत.