कोल्हापुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

<p>कोल्हापुरात विद्यार्थिनीची आत्महत्या</p>

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतीगृहात एका 23 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ईशिता मधुसुधन सावंत असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती वसतीगृहात राहात होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशिता सावंत हिने शुक्रवारी दि. 20 मार्च रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजी विद्यापीठ वसतीगृहातील खोलीत छताच्या फॅनच्या हुकाला नायलॉन दोरीनं गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं तिला खाली उतरवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दीड वाजण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. यामुळं वसतीगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

काही महिन्यापूर्वी  शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतीगृहात गायत्री पंढरीनाथ रेळेकर या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती.