बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत लक्ष्मण हाकेंचे सूचक वक्तव्य... 

<p>बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत लक्ष्मण हाकेंचे सूचक वक्तव्य... </p>

पुणे - बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादीकडून सुरु असताना ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी, लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले कि, "बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आलेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पवार घराणं प्रोफेशनल राजकारण करत आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी साधन असतं," असे त्यांनी म्हटल्याने हाके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पहावे लागणार आहे.