कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड आज

<p>कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड आज</p>

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज दुपारी २ वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून दोन्ही पदांसाठी नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अध्यक्षपदासाठी कागल येथील शिल्पा शशिकांत खोत यांचे नाव आघाडीवर असून, उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून तानाजी पाटील यांची निवड निश्चित झाल्याचे समजते. या निवडीसंदर्भात अंतिम निर्णयाचा अधिकार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

आज होणाऱ्या निवड प्रक्रियेत या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.