उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याबाबत खळबळजनक गोष्ट आली समोर...

दोन वर्षापासून उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट रेशनकार्ड

<p>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याबाबत खळबळजनक गोष्ट आली समोर...</p>

संभाजीनगर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. गेल्या दोन वर्षापासून संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट रेशनकार्ड बनवण्यात आले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली.

याबाबत अधिक चौकशी केलं असता, सदर रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.