कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल : मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
कोल्हापूर - ज्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेत ज्यांचे सर्वात जास्त नगरसेवक असतील त्यांचा महापौर करण्याचा निर्णय झाला, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही निर्णय होईल आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपूर्वी महायुतीमधील तिन्ही पक्षांची आणि मित्रपक्षांची बैठक होईल. त्यामध्ये ज्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेत ज्यांचे सर्वात जास्त नगरसेवक असतील त्यांचा महापौर करण्याचा निर्णय झाला, त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हापरिषदेतही निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी राहील आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होई,ल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.