जे काही बोलायचे आहे ते 19 तारखेला एकदाच बोलून टाकू : राज ठाकरे 

<p>जे काही बोलायचे आहे ते 19 तारखेला एकदाच बोलून टाकू : राज ठाकरे </p>

रायगड – आज मनसेचा २० वा वर्धापन दिन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला. यावेळी त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला. 
यावेळी बोलताना त्यांनी, नऊ तारखेला वर्धापन दिन आहे आणि 19 तारखेला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्यामुळे दोन वेळेस बोलण्यापेक्षा जे काही बोलायचे आहे ते 19 तारखेला एकदाच बोलून टाकू, असे म्हटले आहे. 
अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. नुसते सदस्य नाही तर त्यांना सक्रिय सदस्य व्हायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या वर्दळीच्या जागा आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स लागली पाहिजेत. तुम्ही लोकांपर्यंत गेले पाहिजे. लोकांशी बोलले पाहिजे. हजारो लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. त्यांना तुम्ही सदस्य करून घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी मनसैनिकांना केले.