महापौरांचा आदेश प्रशासनाकडून केराच्या टोपलीत?; ड्रेनेज, पाईप लाईन चे काम पूर्ण न करता रस्त्याचं काम सुरु

<p>महापौरांचा आदेश प्रशासनाकडून केराच्या टोपलीत?; ड्रेनेज, पाईप लाईन चे काम पूर्ण न करता रस्त्याचं काम सुरु</p>

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक आक्रमक निर्णय जाहीर करत प्रशासनाला विविध सूचना दिल्या होत्या. मात्र या आदेशांचे प्रत्यक्ष पालन होताना दिसत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे.


कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात अमृत पाईपलाईन मंजूर असून देखील ती टाकण्यापूर्वीच रस्त्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. रस्त्याचे काम हाती घेण्यापूर्वी ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईनची कामे पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना नवनिर्वाचित महापौरांनी प्रशासनाला दिल्या होत्या.


मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केल्याने काम सुरू झाल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह नागरिकांकडून करण्यात येत आहे. राजारामपुरीतील नागरिकांनी या कामाला विरोध दर्शवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

एकंदरीत पाहता महापौरांचा आदेश प्रशासनाने केराच्या टोपलीत टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. महापौरपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होत असेल, तर पुढील काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी होणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.