‘या’ दिवशी होणार कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती अन् इतर समितींच्या सभापती पदांसाठी निवडणूक
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती पदांची निवड येत्या 11 मार्च रोजी बैठक घेवून होणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार दिली आहे. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून होणार बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे असणार आहे.