मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

<p>मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे</p>

 

कोल्हापूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी ६० दिवसांच्या आत तपास पूर्ण करून संबंधितांवर मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पोलीस विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून सर्व प्रकरणे मार्गी लावावीत. तपास प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे.

यावेळी १५ पीडितांच्या अर्थसाहाय्य प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. प्रारंभी सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवले तसेच तपासाबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती सादर केली.

बैठकीस पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, डॉ. रेश्मा पाटील, एलसीबी पथकाचे एन. डी. माळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिजीत खोत, समाजशास्त्र विभागाचे डॉ. जगन कराडे, माहिती अधिकारी फारुख बागवान, अशासकीय सदस्य संतोष तोडकर, तसेच महिला व बालविकास विभागाच्या नीलम धनवडे आदी उपस्थित होते.