माजी नगरसेवक जयराम पचिंद्रे यांचे निधन
कोल्हापूर – माजी नगरसेवक जयराम श्रीपतराव पचिंद्रे यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज दुपारी १.१५ वाजता अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांचे वय ७१ वर्ष होते. त्यांनी कोल्हापूर महापालिकेत लक्ष्मीपुरी प्रभागातून दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. स्थायी समिती सभापती, शिक्षण मंडळ सभापती, परिवहन समिती सभापती अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.