माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे निधन
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते गेल्या दोन दिवसापासून आजारी होते. त्यांना कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष होते. माजी महापौर सरिता मोरे यांचे ते पती होते.
नंदकुमार मोरे यांचे बंधू सुभाष मोरे हे नगरसेवक होते. २००० मध्ये नंदकुमार मोरे खोलखंडोबा प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी केएमटीला भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने केएमटी रुळावर आली आहे. महानगरपालिकेतील विद्युत विभागातील भ्रष्टाचार त्यांनी पाठपुरावा करुन उघडकीस आणला होता. नुकतीच झालेली महानगरपालिका निवडणूक त्यांनी लढवली होती. पण ते थोडक्या मतांनी पराभूत झाले होते.