विमान वापराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय...
मुंबई - ‘VSR’ कंपनीच्या विमानातून प्रवास करताना बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे ‘VSR’ कंपनीच्या विमानातून प्रवास करण्यास शिंदे गटाच्या नेत्यांनी नकार दिला आहे.
पक्षातील आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्या कंपनीच्या तांत्रिक मानकांबाबत प्रश्न निर्माण होत असताना भविष्यात धोका पत्करणे योग्य नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या कामासाठी किंवा नेत्यांच्या दौऱ्यांसाठी ‘VSR’ कंपनीच्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर येत आहे.