अपघात प्रकरण : विधीमंडळाच्या एका बड्या नेत्याचा तक्रार घेऊ नका म्हणून फोन येतो, हा काय प्रकार : खा. संजय राऊत
मुंबई – आ. रोहित पवार हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. परंतु त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर खा. संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्याचे सरकार आणि मुख्यमंत्री हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अपघात म्हणतात. मात्र आम्ही याला अपघात म्हणणार नाही. आम्ही याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणतोय. आपला एक सहकारी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा यात मृत्यू होत असताना ही बाब सरकार हलक्यात घेतंय.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जवळचा नातेवाईक तक्रार करायला जातो आणि विधिमंडळाच्या एका बड्या नेत्याचा तक्रार घेऊ नका म्हणून फोन येतो, हा काय प्रकार आहे? म्हणजे सरकारचे जे अश्रू आहे ते मगरीचे अश्रू होते का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.