बारामतीत मोठी गर्दी...
पवार समर्थकांची पोलीस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी
पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आज आ. रोहित पवार वकिलांची फौज घेऊनच बारामती पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही उपस्थित आहेत. यावेळी समर्थकांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली आहे.
यावेळी समर्थकांची पोलीस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु केल्याने परिसर दणाणून गेला आहे. यावेळी तक्रार दाखल करण्यासाठी समर्थकांचा जोर वाढत चालला आहे. जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे, असं म्हणत हातात पोस्टर घेऊ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत.