अपघाताबाबत बारामतीत एफआयआर दाखल करणार : आ. रोहित पवार
मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात की घातपात हा मुद्दा आ. रोहित पवार यांनी उचलून धरल्यानंतर डीजीसीएने व्हीएसआरच्या चार विमानांवर बंदी घातली आहे. यावर बोलताना आ. रोहित पवार यांनी, जनतेच्या दबावानंतर अपघाताच्या तपासाला वेग आला आहे. परंतु व्हीएसआर विमानाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याने हा अपघात झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. असं असताना डीजीसीएकडून व्हीएसआरला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. डीजीसीएच्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही त्यामुळे या अपघाताबाबत बारामतीत जाऊन एफआयआर दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.