समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा जमीन घोटाळा : अंबादास दानवेंचा शिंदेंच्या ‘या’ खासदारावर गंभीर आरोप
संभाजीनगर - उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे ‘हिबानामा’ (बक्षीस पत्र) करून बळकावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर केला आहे. संबंधित जमीन संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा (बक्षीस पत्र) करण्यात आली. हा हिबानामा 1971 साली झाल्याच्या दाखवलं जात आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. त्यामुळे 1971 मध्ये त्याच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.