कुणाला  किती बदनाम करायचं याची मर्यादा राजकारण्यांनी पाळायला हवी  : उद्धव ठाकरे 

<p>कुणाला  किती बदनाम करायचं याची मर्यादा राजकारण्यांनी पाळायला हवी  : उद्धव ठाकरे </p>

मुंबई – आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय  अधिवेशनाला  सुरुवात झाली आहे. यावेळी  विधानपरिषदेत माजी उपमुख्यमंत्री  स्व.अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. 

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, दादांसारखा एक दिलदार मित्र मी गमावला आहे असं सांगितलं. . मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडत आपली ओळख निर्माण करणारा  तसेच  सखोल अभ्यास करणारा सहकारी अभावाने आढळतात त्यापैकी अजित दादा हे एक होते. कोव्हिड काळात  कोणतीही योजना बंद  पडू दिली नाही ही कसब अजित पवारांची होती, असं म्हणत त्यांनी, माणूस  जगातून गेल्यावरच त्याचा उदोउदो होतो. असल्यावर त्यांची बदनामी केली जाते, असे ते म्हणाले.
भाजपने त्यांच्यावर ७० कोटींचा आरोप केला त्यावेळी त्यांची खूप बदनामी झाली. तेव्हा  कुणाला किती बदनाम करायचं याची मर्यादा राजकारण्यांनी पाळायला हवी, असंही त्यांनी म्हटले आहे .