अजित पवारांचा अपघात की घातपात ? : चौकशीच्या मागणीसाठी बारामती तालुक्यातील गावं पाळत आहेत बंद
पुणे - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात की घातपात यावर सध्या राज्यात खूप चर्चा रंगत आहेत. यावर आ. रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांनी ‘अजित पवारांचा अपघात की घातपात’ यावर वेगळा पॅटर्न राबवायला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची राज्य सरकारने सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे, या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाने बंद पाळला होता. त्यावेळी लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी या गावाने आज बंद पाळला आहे. असं बंद पाळणारं हे दुसर गाव ठरलं आहे. या बंदच्या आगळ्या वेगळा पॅटर्नमुळे ही गावं विशेष चर्चेत येत आहेत.