कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचे निधन
कोल्हापूर - काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते, कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
कुरुंदवाडमध्ये त्यांनी 17 वर्षे नगराध्यक्ष पद भूषवले होते. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुरुंदवाडच्या राजकारणात कायम सक्रिय राहिलेली एक स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती हरपल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.