शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल..
प्रकृती बिघडली
पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काहीदिवसांपूर्वीच शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागल्याने पाच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते आता त्यांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल आले आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे