महायुती सरकारकडून ब्राम्हण समाजाची फसवणूक - राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांचा आरोप
कोल्हापूर - परशुराम आर्थिक विकास महामंडळ नावापुरतेच स्थापन करून ब्राह्मण समाजाची महायुती सरकारकडून फसवणूक करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी केला आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी 10 कोटींची तरतूद असताना 50 कोटींची जाहिरातबाजी करून महायुती सरकारने ब्राम्हण समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचेही म्हटले आहे.