मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर दुःखाचा डोंगर...
संभाजीनगर – शिंदे गटाचे सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची पत्नी नफिसा बेगम यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
नफिसा बेगम या सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी काही काळ सिल्लोडचे नगराध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.