उद्धव ठाकरेंच्या धाकट्या पुत्रावर रुग्णालयात उपचार सुरु...
मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. तेजस ठाकरे यांना ताप असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.