पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळता ? : खा.संजय राऊत यांचा सवाल
मुंबई – सध्या टिपू सुलतानवर सुरु असलेल्या चर्चेवरून खा. संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल करत, देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती उचबंळून वर आली आहे तर मग त्यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही हे सांगितलं पाहिजे, पण ते सांगणार नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
खा.संजय राऊत म्हणाले, या क्रिकेटमधून पैसे मिळतो. शेकडो कोटी रुपये मिळतात. भारत-पाक सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो. हाच पैसा पुलवामा, उरी, पहलगाम या ठिकाणी जे अतिरेकी येतात त्यांना पुरवला जातो. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ही ढोंगं आहेत ती उघडी पडत आहेत. पाकिस्तानसोबत क्रिकेट नको हे एक तरी भाजपाचा माणूस सांगतो आहे का? जो पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतो, हिरो मानतो, योद्धा मानतो त्याच्याबरोबर क्रिकेट कसं खेळू शकता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.