लाचखोर प्रकरणात आपला कोणताही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन : मंत्री नरहरी झिरवाळ

<p>लाचखोर प्रकरणात आपला कोणताही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन : मंत्री नरहरी झिरवाळ</p>

मुंबई – काल राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. यावेळी क्लार्क राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, या प्रकरणात आपला कोणताही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन, असे म्हटले आहे.
“आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करणार आहे.  हा प्रकार चुकी़चा असून, असे व्हायला नको होते. ढेरंगे हे आपल्याकडे क्लार्क म्हणून काम करतात. सुनावणी ते पेपर बनवण्याचे काम करतात. तसे ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतललं होतं. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही," असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.