इचलकरंजी महापालिकेत महापौर उदय धातुंडे अन् उपमहापौर अनिल डाळ्या यांनी स्वीकारला पदभार...
इचलकरंजी - महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. या निवडणुकीत त्यांचे एकूण ४७ उमेदवार विजयी झाले आहेत. या बहुमताच्या जोरावर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. महापौर पदी उदय धातुंडे यांची तर उपमहापौर पदी अनिल डाळ्या यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
आज महानगरपालिकेचे पहिले महापौर उदय धातुंडे यांनी आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी कार्यालयात प्रवेश करून पदभार स्वीकारला. त्यानंतर महापौर धातुंडे यांनी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.