‘…तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय’ : भगतसिंह कोश्यारींवर खा. संजय राऊत संतापले 

<p>‘…तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय’ : भगतसिंह कोश्यारींवर खा. संजय राऊत संतापले </p>

मुंबई - माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने वारंवार चर्चेत असतात. आता तर त्यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय त्यामुळे खा. संजय राऊत चांगलेच संतापले आहेत.
भगतसिंह कोश्यारी यांनी, राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढा का घाबरत आहेत असे वक्तव्य केलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी, ज्याला धोतर नीट नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. तो ठाकरेंना सांगतोय की मोदींना घाबरू नका म्हणू, मोदींना कोण घाबरतंय. काल राहुल गांधीनी संसदेत सांगितलं आहे ना... डोळ्यात डोळे घालून अमित शहा अन् नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बोलण्याची हिंमत आमच्यात आहे. राहुल गांधींचे भाषण सुरू असताना अमित शहा आणि पंतप्रधानांनी संसदेतून पलायन केलं, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.