लोकसभेत राहूल गांधींचा रूद्रावतार...भारतमातेला विकला लाज वाटत नाही का ? : राहुल गांधी
एपस्टीन फाइल्स, डेटा, व्यापार करार सगळंच बाहेर काढलं...
नवी दिल्ली - लोकसभेत विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आज केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी राहुल गांधी यांनी, अमेरिकेसोबतचा व्यापार करार, एपस्टीन फाइल्समधील खुलासे आणि अर्थसंकल्पाबाबतही सरकारवर टीका केली आहे.
ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता तोच डेटा मोदी सरकारने परकीयांच्या हाती सोपववलाय, असा आरोप राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. केंद्र सरकारने भारताला विकले आहे. तुम्ही आमची आई, भारत माता विकली आहे. भारतमाता विकल्याची तुम्हाला लाज वाटत नाही का?, असा घणाघात त्यांनी केला.
पंतप्रधानांनी भारत का विकला. कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. त्यांनी मान घट्ट धरली आहे. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती स्पष्टपणे दिसत असल्याचे राहूल गांधींनी सभागृहात सांगितले. सभागृहातून बाहेर आल्यानंतर राहूल गांधींनी माध्यमांशी बोलताना अमेरिकन न्याय विभागाकडे एपस्टीन प्रकरणांशी संबंधित फाइल्स असल्याचे सांगितले. यामध्ये हरदीप पुरी आणि अनिल अंबानी यांची नावे असल्याचे सांगितले. अदानी यांच्यावर एक खटलास सुरू आहे. त्यांना समन्स बजावण्यात आले आहे आणि त्यांनी १८ महिन्यांपासून प्रतिसाद दिला नाही पंतप्रधानावर दबाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना सभागृहात तीन महत्वाचे मुद्दे मांडले. सरकारने व्यापार करारात गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला असून सरकारने आपली ऊर्जा सुरक्षा अमेरिकेला सोपवल्याचा आरोप केला जर भारताने अमेरिकेची इच्छा नसलेल्या कुठल्या देशाकडून तेल खरेदी केलं तर ते भारताला शिक्षा करतील आणि आपले टंरिप पुन्हा ५० टक्कयांपर्यत वाढवतील. कोणत्याही पंतप्रधानांनी या आधी हे केलेले नाही आणि तुमच्यानंतर कोणतेही पंतप्रधान हे करणार नाहीत असेही राहूल गांधी सभागृहात म्हणाले आहेत.