दादांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता : दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत काल आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज त्यांनी दिल्लीतही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मृतदेहाबाबत गंभीर आरोप केला आहे.
दादांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता, मृतदेह प्रमाणापेक्षा जास्त फुगलेल्या अवस्थेत होता, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले आहे.