सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार... 

<p>सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार... </p>

मुंबई – दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री पद आले. त्या अनुषंगाने त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आज त्यांनी मंत्रालयामधील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे,मंत्री छगन भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,धनंजय मुंडे, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.