खोकल्याचा त्रास वाढल्याने खा. शरद पवार रुग्णालयात दाखल  

<p>खोकल्याचा त्रास वाढल्याने खा. शरद पवार रुग्णालयात दाखल  </p>

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खोकल्याचा त्रास वाढल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत.

आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर ग्रँट यांनी म्हटले आहे की, “पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ"