जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी

<p>जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान</p>

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात जिल्ह्यातील एकूण 2 हजार 691 मतदान केंद्रांवर 74.35 टक्के मतदान झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील एकूण 23 लाख 40 हजार 199 मतदारांपैकी 8 लाख 94 हजार 115 पुरुष, 8 लाख 45 हजार 857 महिला, तसेच 35 इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण 17 लाख 40 हजार 7 मतदारांनी मतदान केले आहे.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
शाहुवाडी : पुरुष 60,336 /महिला 57,033 / इतर 0 / 73.76%

पन्हाळा : पुरुष 87,682 / महिला 79,525 /इतर 4 / 76.58%

हातकणंगले : पुरुष 1,32,949 / महिला 1,23,445 / इतर 7 / 72.08%

शिरोळ : पुरुष 88,100 / महिला 83,611 / इतर 2 / 71.52%

कागल : पुरुष 80,262 / महिला 76,906 / इतर 1 / 78.31%

करवीर : पुरुष 1,66,814 / महिला 1,54,184 / इतर 7 / 78.64%

गगनबावडा : पुरुष 13,225 / महिला 11,658 / इतर 0 / 86.03%

राधानगरी : पुरुष 73,032 / महिला 65,304 / इतर 5 / 79.34%

भुदरगड : पुरुष 49,057 / महिला 47,433 / इतर 3 / 72.29%

आजरा : पुरुष 29,734 / महिला 31,997 /इतर 0 / 63.90%

गडहिंग्लज : पुरुष 58,703 / महिला 59,722 / इतर 6 / 69.04%

चंदगड : पुरुष 54,221 / महिला 55,039 / इतर 0 / 71.34%

जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.