सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री पद बेकायदेशीर : ॲड. हर्षवर्धन गोडघाटेंचे राज्यपालांना पत्र
ॲड. हर्षवर्धन गोडघाटेंचे राज्यपालांना पत्र
मुंबई – सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही बेकायदेशीर आहे. जे की असंवैधानिक आणि भारतीय संविधांच्या विरोधात आहे. भारतीय संविधानात कुठेही उप-मुख्यमंत्री पदाची तरतूद नाही, अशा आशयाचे पत्र वर्धाचे ॲड. हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे यांनी राज्यपालांना लिहिले आहे. यावर राज्यपाल काय निर्णय देतात हे पहावे लागणार आहे.
पत्रात म्हटले आहे कि, राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना शपथबद्ध होण्यास सांगितलं तेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं दोनदा म्हटलंय हे असंवैधानिक आणि भारतीय संविधांच्या विरोधात आहे.. भारतीय संविधानात कुठेही उप-मुख्यमंत्री पदाची तरतूद नाही. त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आपोआपच बेकायदेशीर आहे म्हणून सुनेत्रा अजित पवार यांना रीतसर भारतीय संविधानाच्या ३ अनुसूचित राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिला आहे. त्यानुसार शपथ देण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्रासारख्या राज्यात ज्यांच्यावर भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडूनच खुलेआम भारतीय संविधानाचे उल्लंघन होत आहे असा संदेश जाईल, असे पत्रात म्हटले आहे.