भारतातील शेतकऱ्यांच्या घामाला पंतप्रधान मोदींनी विकले...

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात 

<p>भारतातील शेतकऱ्यांच्या घामाला पंतप्रधान मोदींनी विकले...</p>

नवी दिल्ली – भारतातील शेतकऱ्यांच्या घामाला पंतप्रधान मोदींनी विकले आहे. त्यांनी फक्त शेतकरी आणि सामान्य लोकांना नाही तर देशालाही विकले आहे. यासाठीच मला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे. 
अमेरिकेसोबतचा व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता, त्यात काहीच बदल न करता स्वाक्षरी केली गेली आहे. जे मला माहीत आहे, ते पंतप्रधान मोदींनाही माहीत आहे. पंतप्रधानांनी काल सायंकाळी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर खूप दबाव असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 
विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले, “मला सभागृहात बोलू दिले जात नाही. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. कारण ज्या लोकांनी त्यांची प्रतिमा तयार केली होती, ती भंग पावली आहे.”