सुनेत्रा पवारांकडे पक्षाचं नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह : खा.प्रफुल्ल पटेल 

<p>सुनेत्रा पवारांकडे पक्षाचं नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह : खा.प्रफुल्ल पटेल </p>

नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह आहे. त्यांना नेता बनवायचं आहे हे काम आपण सगळ्यांनी केलं तर हीच खरी अजित पवार यांना श्रद्धांजलीठरेल, असे प्रतिपादन  खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. आज दिल्लीतील राष्ट्रवादी कार्यालयात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 
यावेळी खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले कि, निधनापूर्वी अजित पवारांशी माझं फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, आपली भेट कधी होईल तर यावर ते योगायोगाने म्हणाले, आपली भेट होणार नाही... प्रचारामुळे आपली भेट होणार नाही असं ते पुन्हा म्हणाले होते. पण ते असे अचानक जातील असं वाटल नाही. १९९१ पासून आमची एकत्र वाटचाल सुरु झाली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत अनेक वेळा काम केलं, असल्याचेही ते यावेळी म्हणाले.