आ. सतेज पाटील यांची कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नुतन नगरसेवकांनी घेतली भेट
आ. सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. आमदार सतेज पाटील यांनी या निवडणुकीत एकाकी लढत देत तब्बल ३४ जागांवर विजय मिळवलाय. या निवडणुकीत कसबा बावडा इथल्या प्रभाग क्रमांक एकमधील काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, सचिन चौगले, रूपाली पोवार धामोडकर यांनी कुटुंबीयांसमवेत, तर प्रभाग क्रमांक पाच मधील काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक अर्जुन माने, विनायक कारंडे, माजी महापौर स्वाती येवलुजे यांच्यासह अन्य नवनिर्वाचित नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत मोठं यश मिळवल्याबद्दल आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. आज दिवसभर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यशवंत निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.