आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

<p>आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क</p>

कोल्हापूर - मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात देखील मतदानाची उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील मतदान करण्यासाठी कसबा बावडा येथील स्व. वाय. बी. पाटील शाळेतील मतदान केंद्रावर दाखल झाले. 

दरम्यान, आमदार सतेज पाटील मतदान करण्यासाठी कसबा बावडा येथील स्व. वाय. बी. पाटील शाळेतील मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत काँग्रेसलाच जनतेचा कौल मिळेल आणि काँग्रेस सत्ता स्थापन करणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला.