सुतार बोर्डिंग बचाव ही लोकं चळवळ : व्ही.डी. लोहार 

<p>सुतार बोर्डिंग बचाव ही लोकं चळवळ : व्ही.डी. लोहार </p>

कोल्हापूर - लोहार उन्नती संस्था ही समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापकतेने काम करणारी संघटना आहे. सुतार बोर्डिंग बचाव ही चळवळ सुतार लोहार समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या वतीने चालवली जाणारी लोक चळवळ आहे. या चळवळीला कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाजाने चांगली साथ दिली असल्याचे  प्रतिपादन उन्नती संस्थेचे मार्गदर्शक व्हि. डी. लोहार यांनी केले.
 श्री अक्कमहादेवी मंटपमध्ये आयोजित सुतार लोहार समाज मेळाव्याच्या  अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रास्ताविक दिगंबर लोहार यांनी  केले.  माजी मुख्याध्यापक एम. के. सुतार यांनी, सुतार लोहार समाज उन्नती संस्था करत असलेल्या सामाजिक न्यायाच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढून समाजासाठी पाच हजार रुपयाची देणगी जाहीर केली. यावेळी सुतार बोर्डिंगचे माजी विद्यार्थी सर्वश्री एम.के. सुतार, सदानंद.डी.सुतार आणि कृष्णात लोहार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन सुतार, सर्वश्री मालती सुतार, राधा मेस्त्री, सुलक्षणा सुतार, राधिका सुतार, युवराज सुतार, सचिन लोहार, अनिल सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.  
यावेळी सुतार बोर्डिंग बचाव ही लोक चळवळ आहे हिला चालवण्यासाठी  दहा हजार सह्यांचे तक्रार अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या कार्यक्रमात संजय सुतार, अनिल सुतार आदींना विविध पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले. स्वागत संस्थेच्या सचिव रूपाली सातार्डेकर यांनी तर  सूत्रसंचालन श्रद्धा सुतार यांनी केले आभार दिपक सुतार यांनी मानले.