ॲमेझॉन क्लाऊडच्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अनेक प्रमुख वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स ठप्प...

नवी दिल्ली – आज ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवा विभागात मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे जगभरातील अनेक प्रमुख वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्स ठप्प झाले आहेत.
या बिघाडामुळे Robinhood, Snapchat आणि Perplexity AI यांसारख्या लोकप्रिय अॅप्सनी काम करणे थांबवले आहे. आता जवळपास एक तास सेवांमध्ये अडथळा राहिल्यानंतर काही प्लॅटफॉर्म हळूहळू पूर्ववत होत आहे.