शनिवारवाडा परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात…

पुणे – पुण्यातील शनिवारवाड्याच्या आवारात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याने काल भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन सारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी शनिवारवाड्याच्या आवारात असलेली कबर हटवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम आंदोलकांनी दिला आहे.
त्यामुळे सध्या या घटनेनंतर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पुणे पोलिसांनी कबरीभोवती आणि शनिवारवाडा परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे.