भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी लवकरच केंद्राचं मोठं पाऊल... 

<p>भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी लवकरच केंद्राचं मोठं पाऊल... </p>

नवी दिल्ली – देशाची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी केंद्राकडून लवकरच शस्त्रास्त्रांचे उत्पादन खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याचा निर्णय होवू शकतो. त्यामुळे संरक्षणाबाबत केंद्राचे हे मोठे पाऊल ठरणार आहे.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने क्षेपणास्त्रे, तोफखाना, दारूगोळा याचे उत्पादन खासगी क्षेत्रांसाठी खुलं करण्यामागचा हेतू आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी होवू शकतो. त्यामुळे आता भारतातील खासगी कंपन्या क्षेपणास्त्रे, दारूगोळा, तोफा बनवू शकणार आहेत.
दीर्घकालीन चालणाऱ्या युद्धांमध्ये भारताकडे कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांची कमतरता जाणवू नये, यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकार हा प्रयत्न करत आहे.